Home

मूक भक्ती... कवयित्री सुलक्ष्मी बाळगी

 मूक भक्ती


नाही कुठे गाजावाजा

ढोल ताशा बॅन्ड बाजा

स्विकारी तु देवराया

मूक भाव हा भक्तीचा.      ||१||

घर माझे हे पंढरी 

देव उभा माझ्या दारी

देई माझ्या ताटातली

भूकेल्यासी मी भाकरी.     ||२||

खिडकीवर ठेवी वाटी 

पक्षी तृष्णा शमविती 

गरीब मुले घरी येती

ज्ञानार्जने आनंदती           ||३||

हीच माझी भक्ती देवा

माणुसकीचा जपला ठेवा

पदरात घेई चुका

माझ्या हातून घडल्या.       ||४||

घर दार सांभाळता

तूच पाठीराखा होता

नाती नवीन जोडता

सोडीला मी पाश गुंता.       ||५||

देई मजलागी शक्ती

कष्ट श्रमाची पावती

पूर्ण व्हावी माझ्या हाती

समाजाची बांधिलकी         ||६||


सुलक्ष्मी सुनील बाळगी 

ठाणे

7045350309

Previous Post Next Post