Home

ज्येष्ठ पत्रकार अभय आपटे यांच्यावर पितृशोक

 ज्येष्ठ पत्रकार अभय आपटे यांच्यावर पितृशोक


अलिबाग (वार्ताहर)

रेवदंडा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभयजी आपटे यांचे वडील कै. आत्माराम यशवंत आपटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. रेवदंडा येथील गणपती आळी परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कै. आत्माराम आपटे यांच्या निधनाने आपटे कुटुंबीयांवर तसेच परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मोठे बंधू, वहिनी, पुतणी तसेच आप्तस्वकीय असा परिवार आहे.

कै. आत्माराम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व आपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना.


Previous Post Next Post