Home

विलास पुंडले यांचा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर

विलास पुंडले यांचा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर

नवी पनवेल (प्रतिनिधी )

 रसायनी टाइम्सचे एकेकाळचे रसायनी येथील वार्ताहर तथा  साहित्यप्रेमी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेलचे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख विलास नरहर पुंडले यांच्या ग्रामीण जीवनावर आधारित "दान निसर्गाचं" या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवी पनवेल येथील कर्नाटक संघ हॉल, सेक्टर-२ येथे संपन्न होणार आहे. 

सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल आणि सर्जनशील पब्लिकेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार असून त्यानिमित्त राज्यस्तरीय कवीसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण संस्कृती, निसर्ग, माणुसकी, लोकजीवन आणि आदिवासी समाजाचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. "दान निसर्गाचं", "नामा गोमा ठाकर", "बैलपोळा", "श्राद्ध", "गिरीजा" आदी कथांमधून लेखकांनी ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्रण केले आहे. 

या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजन लाखे राहणार असून, कवी संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड भूषविणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून प्रा. प्रतिभा सराफ, पुष्पराज गावंडे आणि प्रा. एन. टी. पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.

लेखन, पत्रकारिता आणि सामाजिक जाणिवांचा संगम असलेल्या विलास पुंडले यांच्या या पहिल्याच कथासंग्रहाबाबत साहित्य वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post Next Post