Home

मानवता प्रतिष्ठान' आयोजित 'कृतज्ञता सोहळा - 2026' टिटवाळा नगरीत झाला मोठ्या उत्साहात संपन्न.

 'मानवता प्रतिष्ठान' आयोजित 'कृतज्ञता सोहळा - 2026' टिटवाळा नगरीत झाला मोठ्या उत्साहात संपन्न.

टिटवाळा (प्रतिनिधी)

'मानवता प्रतिष्ठान' ही सामाजिक संस्था गेली कित्येक वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. समाजासाठी  झोकून देऊन काम करणाऱ्या ह्या संस्थेने समाजासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तिमत्व ह्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांना हे कार्य अजून पूढे नेण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्याप्रति असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून हा 'कृतज्ञता सोहळा' आयोजित केला होता. मा. किशोर शेळके सर सचिव क.डों.म.पा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला ह्यावेळी मा. शिवानी पवार मॅडम, विस्तार अधिकारी पंचायत समिती शहापूर, मा. परेश गुजरे साहेब सामाजिक नेतृत्व, टिटवाळा, समाजसेवक मा. डॉ. रामचंद्र देसले सर, लेखक दिग्दर्शक मा. एकनाथ देसले सर, माथाडी कामगार ठाणे जिल्हाध्यक्ष मा. रमेश विशे सर, मा. श्री. आनंदकुमार रामनरेश सर, मा. श्री. कचरू सापळे सर, मा. श्री. पुंडलिक फर्डे सर ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला ह्या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने समाजासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आष्टे, ता. शहापूर यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शाळा पुरस्कार देऊन,जिवरक्षक सामाजिक संस्था शहापूर यांना छत्रपती संभाजी राजे जीवन रक्षक शौर्य पुरस्कार देऊन,वाईल्ड इंडिया 05 फाउंडेशन, मुरबाड यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज सृष्टीमीत्र पुरस्कार देऊन,राजे श्री शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श संघटना पुरस्कार देऊन,फादर जॉर्ज जोसेफ कावुकाट्ट ( फादर बाबा),कर्नाटक यांना संत गाडगेबाबा आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन, दिनेश धोंडिबा जाधव, लोणावळा यांना संत रोहिदास आदर्श समाजमित्र पुरस्कार देऊन,श्री. उमेश मारुती भेरे  शहापूर यांना कृष्णराव भालेराव आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन, श्री. गणेश वाळिंबे, अल्याणी  यांना सम्राट बळीराजा आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन, श्रीम. प्रतिभा इरकशेट्टी, ठाणे  यांना सिंधुताई सपकाळ दिव्यांग मित्र पुरस्कार देऊन,श्रीम. संगीता उतेकर, कर्जत यांना राजमाता जिजाऊ प्राणीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर आपण करत असलेल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या श्री. धनाजी शेलवले  सर क्षेत्रसंघटक,  स्काऊट - गाईड विभाग मुंबई मनपा, श्री. शाम बांगर हास्यजत्रा फेम, कु. साई धनाजी फर्डे, गुणवंत विद्यार्थी  यांना विशेष सन्मान करून गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी निवड केलेल्या सामाजिक संस्था व व्यक्तिमत्व हे मानवता टीमने खूप अभ्यासपूर्ण निवडले होते याची ग्वाही उपस्थितीतांनी दिली त्यातूनच हा कार्यक्रम किती सुयोग्य पद्धतीने साकारला गेला होता याची प्रचिती आली.कार्यक्रमात खरी रंगत आणली प्रा. भगवान विशे सर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने,संस्थेचे सचिव श्री. योगेश विशे यांनी प्रास्ताविक सादर करून ह्या कार्यक्रमाचा खरा उद्देश उपस्थितांपुढे मांडला तर आभार प्रदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्रसाद फर्डे यांनी हा कार्यक्रम ज्यांच्यामुले यशस्वी झाला त्या सर्वांप्रति ऋण व्यक्त केले व मानवता टीम झोकून देऊन काम करत असल्याने असे कार्यक्रम राबविताना कुठलीच अडचण येत नाही असा ठाम विश्वास मानवता टीमबाबत व्यक्त केला.

Previous Post Next Post