घन निळा बरसला
निळ्या या घना सवे
आलंय अमृत भरून
वाट पाहतोय बळीराजा
त्याची शेतात पेरणी करून
सांडली कस्तुरी,
दरवळतो गंध
पवन ही वाहतो,
निर्मळ आणि मंद -मंद
जुन्या ऋतूचे वस्त्र
बाजूला सारून
सजली वसुंधरा हिरवी
शालू धारण करून
पहिले थेंब पडताच पावसाचे
सुगंध सुटतो मातीला
जलधाराच्या वर्षावाने
पुन्हा नवेपण सृष्टीला
पावसाच्या रूपाने होते
धरती - आसमंताच मिलन
भू मातेच्या उदरा पोटी
अंकुरते नव जीवन
नव चैतन्य घेऊनी संगे
उजाळते रोज नवी सोनेरी पहाट
पावसाच्या सानिध्यात पहा
निसर्गाची नित्य नवी थात- बाट
कवित्री पायल राठोड,
यवतमाळ