Home

बंडखोरी....कवी माणिकराव गोडसे


      बंडखोरी


सर  पावसाची  नाही 

बंडखोरी    पूर   येतो

पडे   पैशाचा  पाऊस 

भोंदू-नेता लाभ घेतो?


आज लोकप्रतिनिधी 

कशासाठी  फुटतात?

करा   आत्मपरीक्षण 

दोष कुणाच्या रक्तात?


मतदार     संघासाठी 

निधी मिळेनाच काही 

दखलही     तक्रारीची

कोणी कधी घेत नाही 


त्यांचं गा-हाणं समस्या

कोण   जाणून  घेणार?

दुःख, नाराजी वाढता

पक्ष   सोडून   जाणार 


मन, रक्त भ्रष्ट नाही 

तोच  टिकून राहतो 

मात्र घोटाळे सम्राट 

शुध्द मशिन पाहतो 


सत्ता, बहुमतासाठी 

जुळवणं चालू आहे 

ऑपरेशनच्या आड

घोडे  बाजारच  राहे


स्वार्थी,भ्रष्ट माणसात 

हरवला        गुणवान 

आज कुणाला म्हणावं?

खरा श्रध्दा -निष्ठावान


कवी माणिकराव गोडसे,

देवळाली कॅम्प-नाशिक

Previous Post Next Post