पेरणी
जुवा लावून जीवाचा
शेतकरी डाव खेळतो.
कर्ज काढून सावकाराकडून
तो पेरणी करतो.
पेरणी नंतर आभाळ
रिकामं एक ही ढग नाही .
निराषाच्य धारा बळीराजाच्या
डोळयातून वाही.
गृहलक्ष्मी ने धीर दिला
म्हणाली मी आहे सोबतीने.
जगाचे आहो पोशिंदे
आपण पुन्हा लढू ताकतीने .
कोरड्या रानाचे त्यांनी
आपल्या घामाने सिंचन केले.
फळ त्यांच्या कष्टाचे
काळया मातीला हिर्वाईचे रूप आले.
काबाड कष्ट करून
तो ऋण फेडतो धरणीचा.
करुन जीवाचा रान
तो पुन्हा सज्य पेरणीला.
कवयित्री पायल राठोड,
यवतमाळ