Home

पोशिंदा.. कवयित्री डॉ. मानसी पाटील

 पोशिंदा 

(लवंगलता ८+८+८+४)


पाणी नाही शेती नाही रान करपुनी गेले

कसे जगावे कुणा सुचेना  डोळे झाले ओले 


कर्जाचाही विळखा पडता सावकार बघ छळतो

या गरिबाची ससेहोलपट देव अशी का बघतो


पैसा नाही अडका नाही शिक्षण सुद्धा अडले 

तगमग बघती मुले पित्याची म्लान होउनी बसले 


लग्न मोडले कन्येचेही हताश होता रडले 

काय जाहले नशिबी आले हात लावुनी बसले


कळा सोसतो तरी देवही अंत असा का बघतो

पोशिंदा मग सर्व जगाचा फासावरती चढतो


घरधनीण अन् कच्चीबच्ची कोलमडुनिया जाती

बघे पाहती दुरून सारे माणुसकी ना जपती

 

का रे देवा भोग असा हा पोशिंद्याच्या भाळी

कशी जपावी  सांग जरा तू  माती अपुली काळी 


डॉ मानसी पाटील

Previous Post Next Post