Home

सुगंधी जखम हृदयातली... कवयित्री माधवी मोतलिंग

 सुगंधी जखम हृदयातली...


सुगंधी जखम हृदयातली

शांतपणे फुलत राहते…

वेदनांच्या खोल गर्भातून

ममतेची पालवी फुटते…


कळा सोसत जगताना

ती स्वतःलाच घडवत असते,

अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून

करुणा अलगद रुजवत असते…


अंतराच्या नाजूक धाग्यांना

हळुवार जपत राहते,

जन्माच्या पवित्र जागी

जीवाला ऊब देत राहते…


ती जखम ओरडत नाही,

वेदनांचं प्रदर्शन करत नाही,

फक्त हसून सांगत राहते 

“बाई, आई होणं सोपं नाही...”


विधात्यालाही जन्म देताना,

आईचं अमरत्व खुलून दिसते,

नवं जग निर्माण करण्यासाठी

अवघी सृष्टी तिच्यात रंग भरते...

      माधवी मोतलिंग

(पनवेल)

Previous Post Next Post