Home

महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावात २०२७ जनगणनेला प्रारंभ

 महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावात २०२७ जनगणनेला प्रारंभ

सातारा(वार्ताहर)

महाबळेश्वर/राज्य भरात १५ वर्षानंतर  ही जनगणना 2027 आजपासून सुरूवात होत आहे. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड याठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष, हाँटेल व्यवसायिक मा.श्री.शंकरराव जांभळे साहेब यांच्या शुभहस्ते त्यांच्या मूळगावी म्हणजे मेटगुताड गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याच शुभहस्ते श्रीफळ वाढवून सुरवात करण्यात आली. यावेळी प्रगणक म्हणून मेटगुताड शाळेचे शिक्षक आणि व्हाईस ऑफ मिडिया सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष मा.श्रीगणेश शेंडे सर तसेच श्री.रमेश सरक सर, श्री. शंकर पवार सर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष इमारत आणि घरगणना केली जाणार असून त्यानुसार प्रगणकास नेमून देण्यात आलेला गावाचा भूभाग त्यामधील इमारती, मंदिरे, शाळा, रस्ते, नदी, तलाव, जंगल, मोकळी मैदानी, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, दवाखाने, इ. सांकेतिक चिन्हाने दर्शवून स्थानदर्शक नकाशा बनवण्यात येणार आहे. जनगणना हे राष्ट्रीय काम असून राष्ट्राच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आवश्यक असलेल्या लाभाच्या योजना देशाची लोकसंख्या, लोकसंख्या वापरत असलेल्या विविध सुविधा यांची माहिती याद्वारे शासनाकडे संकलित होणार आहे. सदर जनगणनेसाठी महाबळेश्वर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री.सचिन मस्के यांच्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रगणकांना यापूर्वीच प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Previous Post Next Post