धोंडा एक आपुलकीचा सण
"आमच्या काळात धोंडा म्हणजे एक उणीव होती. जावयाचा रुसवा-फुगवा काढण्यासाठी त्याला सासरवाडीला गोड-धोड, आंबट-तिखट खाऊ घालून,काही पैकाटक्का, काही डाग अंगावर चढवून, नवे कापडं पाचिपांघरून घेऊन, पाच भांडी घेऊन, पूजेला बसवून त्याला सासरवाडीला मानपान दिला जायचा."
'आमच चांदोरी गाव. गोदावरी नदी च्या तिरी वसलेलं. गावाच्या तिरसत्याला आमचं घरं. जेमतेम अधिकमास लागला की मुऱ्हाळी लाडाच्या जावईला आन् कार्टीला लईच लगबगीत सासुरवाडीला घेऊन जात दिसायची. गावाकडं सासुरवाडीला जसा दिवाळी सण चालायचा त्याच गुर्मीत अधिकमास सण पण जोरात असायचा. लेक-जावई घरला येणार म्हणून, २-४ दिस आगुदरचं घराची आवरणासावर चालायची. शेणानं अंगण सारवून, भिंती पांढऱ्या मातीने पोछारून, घरातलं जाळ बिळ काढून, रंग-रंगोली काढून एकदम भारी साफ सुथरित घर व्हायचं. ते मंजी सणासुदीला कधी तरी होत असायचं. आमचे आबा म्हणायचे "आमच्या काळात धोंडा म्हणजे एक उणीव होती. जावयाचा रुसवा-फुगवा काढण्यासाठी त्याला सासरवाडीला गोड-धोड, आंबट-तिखट खाऊ घालून, काही पैका टक्का, काही डाग अंगावर चढवून, नवे कापड पाचिपांघरून घेऊन, पाच भांडी घेऊन, पूजेला बसवून त्याला सासरवाडीला मानपान दिला जायचा. मानकरी जरी असला तरी ते एक आठवण अन् डोळ्यातली साठवण असायची पोरा. हौस- मौस असायची, खेळन - बागडन असायचं. वेड वाकडं का होईना लेकीला आपल्या माहेरी तिच्या नवऱ्याला दिलेल्या मानाचं अभिमान वाटून तिचे डोळे पाणवायचं. कितीबी गरिबी असली तरी अगदी थाटमाथाट हा सण सुरू व्हायचा. अगदी नवलाईने माखून , आंब्याच्या आंबडीत आम्डून निघायचा. पोट्टीचं सुख बापाला बघायच असायचं. तिच्या डोळ्यातल्या आनंदाची चाहूल बापाला व्हायची. तिच्या नवऱ्याच्या मस्करीत
हेमंत पवार
नाशिक