सहजानंद आध्यात्मिका गोपाळनिवास वृद्धाश्रमास सदिच्छा भेट
अलिबाग (प्रतिनिधी)
अलिबाग तालुक्यातील मानी येथील सहजानंद आध्यात्मिका गोपाळनिवास वृद्धाश्रमास सौ. पानस्कर सौ.ज्योती पाटील, नेहा घरत , सौ. संध्या कुलकर्णी सौ. प्राची ठाकूर , धरमदास डवले , मिलिंद सुळे , शुभांगी जोगळेकर,सौ. श्रद्धा शहा, निर्मला फुलगावकर, सौ. सुनिता गारे, नितीन कुमार राऊत, शांताराम राऊत, श्रावणी पाटील, श्रीधर पाटील, नारायण हरणे, या मान्यवरांनी सहजानंद अध्यात्मिका गोपाळ निवास वृद्धाश्रमास सदिच्छा भेट दिली.
वृद्धाश्रमातील स्वच्छता, रहिवाशांची काळजी, भोजन व्यवस्था तसेच विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर सर्व पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. वृद्धाश्रमातील प्रेमळ वातावरण आणि उत्कृष्ट व्यवस्थापन पाहून ते अत्यंत आनंदित व समाधानी झाले.
यावेळी पाहुण्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी साखर, बिस्किटे तसेच इतर उपयुक्त वस्तूंचे वाटप केले. तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेला सन्मानचिन्ह प्रदान करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांच्याकडून सदिच्छा भेट व सन्मानचिन्ह स्वीकारले. त्यांच्या दूरदृष्टी समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत असून संस्थेचे कार्य अधिकाधिक प्रभावीपणे पुढे जात असल्याचे मान्यवरांनी गौरवद्वार काढले.संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आनंद व प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.