Home

भातुकली... कवयित्री वर्षा रोडे

 भातुकली 


आयुष्याच इंद्रधनुष्य भातुकलीच्या खेळात खुलत 

संसाराच्या वेलीवरचं हितगुज क्षणाक्षणांनी मोहरत 

रुसव्याफुगाव्यातूनही नात्यातली वीण समृद्ध होत जाते 

सप्तरंगानी जीवनातली रंगत गंधित होते 

या हृदयीचे त्या ह्रदयी पोहचवते ती भातुकली 

संसाराचा भावसागर तरुन नेते ती भातुकली 

एक डाव मांडून आयुष्याच सोन करते 

भूमिका नव्या स्वीकारून स्वतः तरुन जाते 

स्वतः ला निभावून नेण्याची प्रत्येकाची कला वेगळी असते 

शेवटी आयुष्य म्हणजे काय... तर एक भातुकलीच असते!!!


सौ. वर्षा सचिन रोडे - पाठक

Previous Post Next Post