Home

रक्षाबंधन....कवयित्री स्मिता गायकवाड

 


रक्षाबंधन


भाऊ बहिणीचे नाते

निर्मळ,अनमोल असे

प्रेमाच्या या नात्याची

महिमा जग जाणतसे


स्नेहरूपी संबंध आपण

अगदी जीवापाड जपुयात

रेशीम धाग्याचे अनोखे बंध

मनात आपल्या रुजवूयात

 

आले माहेराच्या भेटीला

रक्षाबंधनाचा सण आज

प्रेमभरे आशीर्वाद हाच

आजच्या दिवसाचा साज


ओवाळीते भाऊराया

मन माझे भारावले

बालपण आठवता

नेत्र माझे पाणावले


दीर्घायुषी,सुखी होवो

माझा प्रिय भाऊराया

देवा सदैव असुदे

तुझ्या कृपेची छाया


देवा परमेश्वरा एक 

तुझ्याजवळ मागणं

सुखी राहोत भावंडे

हेच तव चरणी सांगणं


सौ.स्मिता अनिल गायकवाड

रायगड

Previous Post Next Post