Home

रक्षाबंधन... कवयित्री सुजाता सोनवणे


 

रक्षाबंधन


अतुट स्नेह विश्वासाचे

हे अमूल्य बंध रेशमाचे

राखीच्या धाग्याने गुंफले 

भाऊबहिणीच्या नात्याचे.


षडरिपूंवर विजय मिळवून

सुरक्षित राहावे ही भावना

सदा सुखी राहो भाऊराया

हीच बहिणीची आराधना.


नि:स्वार्थ पवित्र जगी

भाऊ बहिणींचे मिलन

टिळा लावून बहिण करते

भावाचे मनोभावे पूजन.


कर्तव्याची जाणीव देणारा

पवित्र उत्सव हा रक्षाबंधन

ध्येय रक्षण करुन भावा

नको करूस मर्यादेचे उल्लंघन.


श्रावणी पौर्णिमेला करती

कोळी बांधव सागर पूजन

हृदयसागराला भरती येऊन

दर्याला करती नारळ अर्पण.


सौ.सुजाता सोनवणे

सिल्वासा

Previous Post Next Post