विलास धाटावकरांची यावर्षी हेट्रिक पूर्ण...
...तर लिजेंड ट्रॉफीचे मानकरी ठरले मुनाफ गोंडेकर.
अलिबाग : कै.संजय म्हात्रे स्मुर्ती चषक २०२४, रेवदंडा-चौल ग्रामस्थ मंडळ आयोजीत मानाच्या नारळ फोडी स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षीच्या विजेतेपदाचे मानकरी विलास धाटावकर ठरले. नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडा आंग्रेनगर येथे भरवण्यात आलेल्या नारळ फोडी स्पर्धेसाठी सालाबादप्रमाणे स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे अध्यक्ष संदेश बेडेकर, मुख्य आयोजक व निवेदक सुहास घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्तमरित्या पार पडली तर यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शरद गोंधळी, राजेंद्र नाईक, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, सदस्य संतोष मोरे, मा. सदस्य संदिप खोत, आसिफ गोंडेकर, सलीम गोंडेकर, राहुल गणपत, दिपेश पाटील, रमेश वार्डे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेमध्ये २४० पेक्षा जास्त नारळ फोडण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरते ते म्हणजे नारळ या नारळाची किंमत ही १५००/- ते २५००/- असते त्याचे महत्त्व असे की ह्या नारळाची कर्टी ही ४ मिलिमीटर तेवढी तर त्याहून मोठी सुद्धा असते सहजासहजी दुकानावर हे नारळ मिळत नाही. तर मारेकरी आणि नारळ टाकणारा या दोघांची ही स्पर्धेत खूप कसरत असते अनेकदा नारळ फोडी खेळताना दुखापत ही होत असते परंतु स्पर्धक कोणत्याही गोष्टीची परवा न करता तन मन धन अर्पण करून खेळ खेळतात. अनेक दिग्गज व अनुभवी या स्पर्धेत भाग घेतात तर फक्त रेवदंडा, चौल इथूनच नाही तर तालुक्याच्या बाहेरून देखील स्पर्धक सहभाग घेतात. या स्पर्धेत नियमांचे उलंघन न व्हावं यासाठी पंचांचा निर्णय अतिंम मानला जातो.
स्पर्धेत प्रथम क्र. पारितोषिक विलास धाटावकर रेवदंडा यांना मिळाले. दृतिय क्र. पारितोषिक निखिल वारगे रा. दिवेआगर, तृतीय क्र. महेश किर रा. वडवळ, तर चतुर्थ क्र. पारितोषिक देवांग सुडकु रा. थेरोंडा यांनी पटकावले. तसेच पुढच्या वर्षी हि स्पर्धेत आणखीन वाढ होईल अशी माहिती मुख्य आयोजक सुहास घोणे यांनी दिली.
