Home

राखी....कवयित्री जयश्री औताडे


 

राखी 


कधी येतोस भाऊराया 

राखीसाठी माझ्या घरा.

वाट बघून थकले डोळे

 तरी सुटेना उंबरा .


सगळे भाऊ येऊन गेले 

रक्षाबंधन संपत आले.

 माझे काय चुकले सांग

 अंतर मज तू का दिले.


 मामा येणार माझा 

म्हणून पोरं बघतात वाट.

 मी राखी बांधण्यासाठी 

मांडून ठेवलाय पाट .


असशील कितीही कामात

 तरी थोडा वेळ काढ.

बांधून घे राखी 

 मुलांचा कर थोडा लाड. 


ठेवून नाही घेणार तुला 

राखी बांधून लगेच जा.

 नकोस आणू भेट काही

 फक्त आशीर्वाद देऊन जा.


जयश्री उत्तरेश्वर औताडे - गायकवाड 

किल्ले धारूर, बीड

मो. 7028277744


Previous Post Next Post