Home

लोक काय म्हणतील...कवी सचिन पाटील

 लोक काय म्हणती


लोक काय म्हणतील?

कितीदा करतोस विचार 

लोक आहेत अनेकजण 

लोकांच्या तऱ्हा हजार 


आपल्या माणसांसाठी 

आपण जगावं लागतं 

लोक म्हणतात काय 

ते ऐकत मन जागतं


आपापल्या परीने प्रयत्न 

करावा लागतो यशासाठी 

माणूस म्हणून जगताना 

अडचणी येतातच पाठी 



लोक काय म्हणतील 

म्हणू देत काहीपण 

आयुष्याचे जगून बघ 

सोन्याचे काही क्षण


ध्येय ठेवावे नजरेसमोर 

प्रवास करावा आनंदाने

आई वडिलांच्या प्रतिष्ठेला 

जपावे आपणच मानाने 



सचिन पाटील 

अलिबाग, रायगड

Previous Post Next Post