Home

सिडकोचे एमडी अश्विन मुदगल यांना महेंद्रशेठ घरत यांनी दिल्या शुभेच्छा!

 सिडकोचे एमडी अश्विन मुदगल यांना महेंद्रशेठ घरत यांनी दिल्या शुभेच्छा!


उलवे(वार्ताहर)


 सिडकोचे नवनियुक्त एमडी अश्विन मुदगल यांची आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि प्रकल्पग्रस्तांना खेळासाठी मैदाने मिळवून देणारे, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून धडपडणारे महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. 22 ) सदिच्छा भेट घेतली आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मनमोकळा संवाद साधला. अश्विन मुदगल यांची अतिशय कार्यतत्पर अधिकारी अशी  ओळख आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या समस्या मार्गी लागतील, असा आशावाद महेंद्रशेठ घरत यांना आहे.

अश्विन मुदगल यांना सुमारे 18 वर्षांचा  प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी त्यांनी सिडकोत सहव्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे सिडकोचा गाढा अभ्यास अश्विन मुदगल यांना आहे. त्याचा फायदा सिडकोचे रखडलेले आणि नवीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी होईल, असाही आशावादही महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post