जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनीचा अभिनव उपक्रम :शिक्षणाची वारी - प्रगतीची भरारी
नागरिक व पालकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
सोलापूर (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी येथे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि शाळा- पालक यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशान"शिक्षणाची वारी शाळेची दिंडी" हा अभिनव उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
टाळ, मृदंग, भगवे पताके, ज्ञान प्रबोधन पर घोषणा आणि संतांच्या अभंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेतले होते. गावातील प्रमुख मार्गावरून दिंडीचे उत्साह पूर्ण संचलन करण्यात आले.
या अनोख्या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणाच्या या जनजागृती मोहिमेला भरभरून शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे"शिक्षणाची हीच खरी वारी, ज्ञान हीच खरी पंढरी" हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनीचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम गावकऱ्यांच्या मनात कायमची छाप उमटवणारा ठरला.
रविकुमार कोरचगाव यांनी मतदारांना SIR बाबत जनजागृती केली. नगर परिषद दुधनी गांधी चौक येथे विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्त्व, विविध जनजागृती गाण्यावर नृत्य सादर केले .
यावेळी तलाठी भाऊसाहेब राहुल बिराजदार यांच्या हस्ते पालकीचे महापुजा करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक पोमू राठोड यांनी या शिक्षणाची वारी दिंडी याविषयी मार्गदर्शन केले.ही दिंडी यशस्वी होण्यासाठी संजीवकुमार बेण्णेसूर रविकुमार कोरचगाव, सुहास पवार व अंजली गुंजोटे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास सैदप्पा झळकी,
गोरखनाथ धोडमनी,मल्लम्मा मोडलकर, अनेक पालक उपस्थित होते.