आलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचा सुपूत्र फ्लाईग ऑफिसर
आलिबाग ( स्वाती जाधव )
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचा सुपूत्र फ्लाइंग ऑफिसर कौस्तुभ मेहुल पाटील यांनी लोहगाव वायुदळ तळावर प्रथम नियुक्ति मिळवली.
मेहुलचे अभिनंदन करावे म्हणून वाघ्रण गावाने या सुपूत्राची वाजत गाजत मिरवणुक काढण्याच्या हेतुने ढोलताशाच्या गजरात मिरवणूक निघावी अशी दिग्गज तयारी केली आहे.
वाघ्रण गावाचे नाव तालुक्यापुरती सिमित न ठेवता संपुर्ण देशभरात नावलौकीक वाढवले आहे.त्यांने २७० तासांचे लढाऊ विमान उड्डाण यशस्वीरित्या पुर्ण केले आणि लोहगाव वायूदळ तळावर वाटचाल सुखी सू-३० mki या अत्याधुनिक लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून देशसेवा करणार आहेत.
मेहूलला केलेल्या कार्यासाठी संपुर्ण गावाकडून हार्दीक अभिनंदनाचे फोन मेसेज व्दारे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी धन्यवाद त्यांच्या कार्याबदूदल मिळत आहे.