माझी सानुली
तव वदनी हास्य कलिका फुलतांना मी फुलते
बोबड्या बोलात ह्रदय लतिका खुलत जाते
तुझ्या शब्द साधना आणि विचार गाथेत मन मोर डोलतो
हळव्या आणि गोजिरवाण्या क्षणांनी प्रत्येक क्षण मंत्रमुग्ध होतो
काय बोलू तुझ्याविषयी हे मज कळेना
मनोद्यानातील भावसुमनांना तुजसाठी गंधाचा परिकोष स्मरेना
तू माझ्या अस्तित्वाची एक हृदयस्पर्शी दिशा
रोमारोमात एक तेजस्विता आणणारी दिव्य आशा
मी धन्य जाहले, मी धन्य जाहले
आज तुझ्यामुळे आई झाले....
सौ. वर्षा सचिन रोडे - पाठक