Home

PUCC 3.0: वाहनांच्या प्रदूषण प्रमाणपत्रात होणार मोठे बदल; BS-6 वाहनधारकांना मोठा दिलासा

  PUCC 3.0: वाहनांच्या प्रदूषण प्रमाणपत्रात होणार मोठे बदल; BS-6 वाहनधारकांना मोठा दिलासा


     पुणे (प्रतिनिधी)

 देशातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control Certificate - PUCC) प्रणालीमध्ये केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. 'PUCC 3.0' या प्रस्तावित नव्या व्यवस्थेंतर्गत वाहनांच्या वयानुसार प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता निश्चित करण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे नव्या वाहनधारकांचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होण्याची शक्यता आहे. सरकारचे उद्दिष्ट वाहनांमधून होणारे प्रदूषण अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे आणि प्रदूषण तपासणीची प्रक्रिया अधिक वैज्ञानिक बनवणे हे असल्याचे सांगितले जात आहे.


*BS-6 खासगी वाहनांसाठी 3 वर्षांची वैधता?*

प्रस्तावानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या BS-6 खासगी वाहनांसाठी प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता तीन वर्षांपर्यंत वाढविण्याचा विचार सुरू आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वाहनधारकांना दरवर्षी PUC प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याची गरज राहणार नाही.


*6 ते 10 वर्षे जुन्या वाहनांसाठी दरवर्षी नूतनीकरण*

सहा ते दहा वर्षे जुन्या BS-6 वाहनांसाठी दरवर्षी एकदा PUC प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तर 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी सध्याप्रमाणे प्रत्येक सहा महिन्यांनी PUC प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचा नियम कायम राहू शकतो.


*BS-4 आणि त्यापूर्वीच्या वाहनांसाठी नियम अधिक कडक होण्याची शक्यता*

मार्च 2020 पूर्वीच्या BS-4 वाहनांसाठीही प्रत्येक सहा महिन्यांनी प्रदूषण प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय BS-1, BS-2 आणि BS-3 श्रेणीतील जुन्या वाहनांसाठी नियम आणखी कठोर होऊ शकतात.


Previous Post Next Post