Home

गुरूकिल्ली तडजोड... कवयित्री प्रिया गावडे

  गुरुकिल्ली तडजोड


असो श्रीमंत, गरीब,

करु नये धरसोड,

सुयशस्वी जीवनाची,

गुरुकिल्ली तडजोड!


एक समंजस यत्न,

नातं टिकवण्यासाठी,

लोक म्हणतात याला,

साता जन्माच्याच गाठी!


रोज करावी लागते,

कधी तत्त्वांशी, स्वप्नांशी,

बरेचदा नकळत,

आपल्यांशी, परक्यांशी!


जाते होऊन सवय,

तीच्यासह जगण्याची,

घेते ताबा आयुष्याचा,

मुभा नसे रुसण्याची!


देतीं त्यागाचे दाखले,

कर्तव्याचे परिमाण,

कधी वाटते स्पर्धाच,

वाढें मनावर ताण!


सौ. प्रिया प्रकाश गावडे,

ठाणे.

Previous Post Next Post