Home

नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात यवतमाळ येथील विजयकुमार ठेंगेकर यांचे कथाकथन

 नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात यवतमाळ येथील विजयकुमार ठेंगेकर यांचे कथाकथन


यवतमाळ (प्रतिनिधी)

तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित “पहिले भीमशब्द साहित्य संमेलन” नाशिक येथे दि. ३१ मे २०२६ रोजी संपन्न होत असून, या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये यवतमाळ येथील प्रसिद्ध कथा व कादंबरीकार विजयकुमार ठेंगेकर यांचे कथाकथन सादर होणार आहे.

नाशिक रोड येथील डॉ. आंबेडकरनगर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, कलाकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. संमेलनात कथाकथन विभागासाठी विजयकुमार ठेंगेकर यांची निवड झाल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

विजयकुमार ठेंगेकर यांनी आपल्या लेखनातून सामाजिक वास्तव, मानवी भावना आणि ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण केले असून त्यांच्या कथा व कादंबऱ्यांना वाचकांकडून मोठी पसंती मिळत आहे. नाशिक येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या सादरीकरणाकडे साहित्यप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

या संमेलनात विविध साहित्यिक उपक्रम, कविसंमेलन, परिसंवाद तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी विजयकुमार ठेंगेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Previous Post Next Post