Home

कवी दिलीप मोकल यांचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२६ ने सन्मान


 कवी दिलीप मोकल यांचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२६ ने सन्मान

अलिबाग (वार्ताहर)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ॲड. उमेशदादा मधुकर ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाई जगताप मित्रमंडळ रायगड, मा. आमदार मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग आणि ॲड. ऊमेश ठाकूर मित्रमंडळ आयोजित कार्यक्रमात कवी, लेखक दिलीप मोकल यांना त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेतांना त्यांचे एकाच दिवशी प्रकाशित झालेले निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, वैचारिक आणि आध्यात्मिक विषयांवर आधारीत तीन काव्यसंग्रह तसेच आजवर लिहिलेल्या सव्वाशेहून अधिक संतांच्या ओवीस्वरुप रचना अश्या उल्लेखनीय लिखनणाकरीता कुलाबा जीवनगौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाठी माजी आमदार भाई जयंत पाटील, आमदार भाई जगताप, खासदार बाळ्या मामा तथा सुरेश म्हात्रे, अध्यक्ष ॲड. ऊमेश ठाकूर, ॲड. प्रविण ठाकूर, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. मानसीताई म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गेली पंधरा वर्षांपासून कवी दिलीप मोकल हे विविध विषय हाताळताना त्यांनी अनेक उत्तम कवितांना जन्म दिला असून संतांचे संक्षिप्त ओवीस्वरुप काव्यलेखन करून संताचिये गावी या सदरात त्यांचे लेखन अविरत चालू आहे. याद्वारे देशभरातील विविध भाषा आणि प्रांतातील संतांचे चरित्र लिहून संतांची ओळख आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचावी हा त्यांचा मानस आहे. या आधिही त्यांना विविध संस्थांकडून राज्यस्तरीय काव्यलेखन,  काव्यरत्न, साहित्यरत्न, साहित्यभूषण, तसेच राष्ट्रस्तरीय समाजभूषण अश्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. कुलाबा जीवनगौरव पुरस्कार २०२६ ने सन्मानित झाल्यामुळे कवी दिलीप मोकल यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कवी दिलीप यांनी ऋणनिर्देश देताना मा. आमदार मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड आणि ॲड. ऊमेश ठाकूर मित्रमंडळ यांचे आभार व्यक्त करून संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post