चटनी-भाकरी
नववधू माप ओलांडुन जाता,
स्वागत केले,काटेरी संडयांनी,
पण,आत्ता फुलांच्या संडयांवरुन
चालताना नाही विसरले काटेरी त्या संड्यानां........
किती सांगु मी कुणाला,
कष्टात चटणी-भाकरी खाऊन
दिवस काढले.....
पण आत्ता आहे समाधानी,
कारण,अजुनही नाही विसरले,
मी,त्या चटनी-भाकरीला......
प्रत्येकाची मने जपता-जपता,
माझे मन मात्र जपणे विसरुन गेले,
तरीही,आहे समाधानी, कारण...
प्रेमळ-जिवा भावाची माणसे,
जोडीत गेले......
संसाराच्या जबाबदाऱ्या पार,
पाडता-पाडता कधी पन्नाशी गाठली,
कळलेच नाही,
माझ्याच मुक भावनांना, ईच्छानां,
मुरड घालून, दुसऱ्यानसांठी झटत
राहीले.....
पण आत्ता आहे समाधानी,
कारण उशिरा का होईना ,माझ्याच,
भावनांचा होतोय आता आदर......
संघर्षमय आयुष्य सारं,पण नाही,
कसली तक्रारार देवा......
कारण परिस्थीतीशी केलीये
हातमिळवणी आत्ता.....
दिवस बदलले,वारे फिरले,
तरी,अजुनही नाही विसरले,
मी,त्या चटणी-भाकरीला......
घेत आहे आत्ता उंच भरारी,
होत आहेत,कौतुक सभोवरी,
पण आत्ताआहे समाधानी,
कारण अजुनही नाही विसरले,
मी त्या चटणी-भाकरीला.........
कवयित्री अश्विनी देशमुख
(महाड, रायगड )
