अलिबाग येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न.
अलिबाग (वार्ताहर)
अलिबाग शहरात "उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान" यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर एस.टी. डेपो (गणपती मंदिर परिसर), अलिबाग येथे दि. 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरामध्ये एस.टी. डेपोतील सुमारे 100 कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात सर्वसाधारण आजारांची तपासणी करून आवश्यक ते मोफत औषधोपचार देण्यात आले.
या उपक्रमासाठी उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना, पिंपळभाट येथील डॉ. मंजिरी पाटील, सिस्टर रुचिता कदम व अंकुश चंदनशिव यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. शिबिराला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आगार व्यवस्थापक श्री. राकेश देवरे, प्रभारक श्री. शिवराज जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. प्रमोद अनमाने यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
सामाजिक बांधिलकी जपत कर्मचारी वर्गाच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून, आयोजक संस्थांच्या या स्तुत्य कार्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव मॅडम, डॉ. राजाराम हूलवान सर व डॉ. नितिन गांधी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
