Home

कोलाडमध्ये मोटरसायकल–स्कूटरचा भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी


 कोलाडमध्ये मोटरसायकल–स्कूटरचा भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी

रायगड - अमुलकुमार जैन 

रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मौजे संभे गावच्या हद्दीत मोरी जवळ वरवटे पाले ते संभे स्टॉप दरम्यान झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले.


अपघातात मयत दिनेश भिकु पवार (वय ३४, विठ्ठलनगर, रातवड, ता. माणगाव) हे त्यांच्या ताब्यातील होंडा शाइन मोटरसायकलवरून धाटावकडे जात असताना, समोरून आलेल्या जावीर इब्राहीम शाह (वय २८, धाटाव, ता. रोहा, मूळ कुशीनगर, उत्तर प्रदेश) यांच्या स्कूटरला जोराची ठोकर लागली. या जोरदार धडकामुळे दोन्ही वाहनांवरून प्रवास करणारे अशपाक मोहम्मद फारुख अली (रा. वार्ड नं १०, शक्ती नगर, कुशीनगर) व मोहन पवहारी सिंग (रा. सिधावे टोला, रामटोकोला, कुशीनगर) यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या.


घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि एस.व्ही.आर.एस. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ कोलाड सिविल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, तर मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात नेले गेले.


कोलाड पोलीस स्टेशनने या प्रकरणी गुन्हा रजि. नं. १३५/२०२५, भारतीय दंड संहिता २०२३ कलम १०६(१), ૨૮૧, ૧૨१(५), १२५(च) व मोटार वाहन कायदा कलम १२८(१)/१७७,१८४ अंतर्गत नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्याकडे चालू आहे.


या अपघातामुळे परिसरात काळजी निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी वाहनांची वेग मर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे. या प्रकारामुळे कोलाड परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीसंबंधी अधिक जागरूकता आवश्यक असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Previous Post Next Post