दत्त जयंती
ब्रम्हा, विष्णू आणि महेश
चालवतात विश्वाचा भार
दत्तगुरु त्रिगुणात्मक रूप
सांगे मानवी जीवनाचे सार...(१)
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री दत्तगुरुचा जप मंत्र
दत्तात्रयाचे चोवीस गुरु
उमलती विश्वाचे गूढ तंत्र...(२)
औदुंबर निवास दत्तात्रेयाचे
चार वेदाचे द्योतक हे श्वान
श्रीदत्तात्रयाच्या कामधेनुला
तेहतीस कोटी देवाचा मान...(३)
गुरुचरित्र पारायण करती
दत्तात्रयाचे परम भक्तगण
संयम महत्वाचा जीवनात
तपसाधनेचे रहस्य शांत मन...(४)
नदीतीरी प्रकटले श्रीदत्तगुरु
गोमाता व चार श्वान संगत
दत्तजयंती पर्वावर दर्शनाने
आध्यात्मिक जीवनात रंगत...(५)
पवित्र श्री दत्तगुरु महिमा
आज गुरू भक्तांनी गायिला
सारा जन्माचा पुण्य सोहळा
या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला...(६)
अरविंद कुळकर्णी
मलकापूर
मो.९८२२६४२२९४
