"मनमंथन" पुस्तक प्रकाशन सोहळा व कवि संमेलन संपन्न
सोलापूर (वार्ताहर)
दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी सोलापुरात रंगभवन चौक येथील समाजकल्याण हॉल येथे कवयित्री लेखिका डॉक्टर सौ. राजश्री संजय जाधव यांनी लिहलेला कविता संग्रह 'मनमंथन' या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर श्री शिवाजी नारायणराव शिंदे, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापीठ, सोलापूर) यांच्या हस्ते संपन्न झाला. या कर्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यिक सीताराम बबनराव नरके, (पुणे ) हे होते. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक श्री राजेंद्र भोसले हे उपस्थित होते.
या पुस्तकाची प्रस्थावना व स्वागत पर भाषण व संयोजन साहित्य लेखक कवी दत्तात्रय इंगळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री नरेंद्र गुंडेली यांनी केले.अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय कवी सुरेश निकंबे व कवी भगवान चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी श्री मयुरेश कुलकर्णी यांनी केले.याच वेळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात सोलापूर व महाराष्ट्रातील मान्यवर कवी श्री मधुकर हुजरे सर, श्री अशोक मोहिते,्सौ.राजश्री जाधव,कु.छाया उंब्रजकरा, श्री प्रकाश महामुनी, सौ.शोभा माळवे,कवियत्री सविता पाटील,कवियत्री सौ. वर्षा (उदगीर) श्री मयुरेश कुलकर्णी, श्री शैलेश उकरंडे, श्री दत्तात्रय इंगळे, श्री जमालोद्दीन शेख,श्री नरेंद्र गुंडेली, सौ.प्रतीक्षा व्हटकर, श्री सुरेश निकंबे, श्री अजय बनसोडे, कु. प्रियांका जगझाप,श्री मुक्तेश्वर मूळे, भगवान चौगुले सर,महेश रायखेलकर, श्री गणेश लोंढे सह चाळीस कवीने आपल्या बहारदार कविताचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमास 150 जणांची उपस्थिती होती.
