Home

रात्र शाळेतील मुलांना दिवाळी फराळ व कपडे वाटप


 रात्र शाळेतील मुलांना दिवाळी फराळ व कपडे वाटप

पुणे (वार्ताहर)

अश्विनी फूटपाथ रात्रशाळा अध्यक्ष तसेच  काव्ययोग काव्य संस्था पुणे अध्यक्ष योगेश हरणे यांच्या वडिलांचा - कै.बालाजी तुकाराम हरणे यांचा12 वा स्मृतीदिन दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांना जाऊन आज 12 वर्ष झाली.दर वर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित  गोर -गरीब तसेच गरजू लोकांना कडपे,अन्नदान,फराळ किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते.  या वर्षी कै.बालाजी तुकाराम हरणे यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त अश्विनी फूटपाथ रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.तसेच वसुधा फाऊंडेशनच्या संस्थापिका,अध्यक्षा सौ.वसुधा नाईक व शीतल नाईक/ शर्मा यांच्या कडून विद्यार्थिनींना कपडे वाटप करण्यात आले.या वेळी योगेश हरणे म्हणाले वडील आमचे कोणाला ना कोणाला मदत करायचे जिथ गरज असेल तिथे उपयोगी पडावं. तसेच त्यांचे मोलाचे बोल म्हणजे समाजसेवा म्हणजे समाजात जाऊन समाज सेवा करणे मुळीच नाही.आपल्या अवती भोवती ही काही लोक असतात त्यांना कशाची ना कशाची गरज पडत असते.अशा लोकांना मदत करणे ही देखील एक समाज सेवाच आहे.त्यांचा वारसा या योगेश हरणे मध्ये आला आहे.तसेच वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा 

सौ.वसुधा नाईक यांनी कपडे वाटप केले. वेळोवेळी अश्विनी फूटपाथ रात्रशाळेतील मुलांसाठी मराठी बालगीतं, बडबड गीतं,चित्रकला असे विविध मनोरंजनात्मक उपक्रम त्या घेतात.ज्ञानदानाचे  कार्य करत असतात.तसेच मुलांना खाऊ वाटप , कपडे वाटप करत असतात.19/10/2025 ला देखील मिठाई वाटप केले.आज  शीतल नाईक यांनी मुलांना इंग्लिश गीते शिकवली.मुलांचा प्रतिसाद उत्तम मिळाला.


Previous Post Next Post