Home

बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गेट टुगेदर देखना सोहळा


गेट टुगेदर देखना सोहळा



बलसूर(प्रतिनिधी)


शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, बलसूर संचलित..
श्री. छञपती शिवाजी विद्यालय, बलसूर या विद्यालयात..
 1999 - 10 वी च्या  बॅच च्या वतीने गेट टुगेदर (माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रम) विद्यालयात उत्साहाने घेण्यात आला.शाळेच्या वेळेनुसार घंटी वाजल्यानंतर राष्ट्रगीत घेऊन..
गेट टुगेदर कार्यक्रम प्राचार्य श्री. जयचंद्र जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच सध्या कार्यरत असलेले इंग्लिशस्कूल चे प्राचार्य श्रीमान पी  टी कांबळे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक श्रीमान एम जी गायकवाड, कार्यरत मुख्याध्यापक श्रीमान सतीश वाकडे, क्रीडाशिक्षक श्री. एम डी काळे, सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान के टी गायकवाड, श्रीमान बळीराम नांगरे उपस्थित होते. 
प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. दत्तात्रय जाधव, एस टी गायकवाड, नागनाथ तेलंग, के डी कांबळे व ईराप्पा हरे उपस्थित होते.

प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व संस्थेचे संस्थापक स्व. भाऊसाहेब बिराजदार यांच्या प्रतिमेचे पूजन...प्रमुख मान्यवर शिक्षकांच्या शुभहस्ते करुन द्विपप्रज्वलन करण्यात आले.

 विद्यालयातील शिक्षकांचे अकस्मित निधन झालेले कै. प्राचार्य मोहन शिंदे, मुख्याध्यापिका श्रीसुंदर एस आर, क्रीडाशिक्षक व्ही एल गरड, हुग्गे सर, कवठे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी दिलीप जमादार, गणुमामा व महादुमामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर 1999 च्या बॅच च्या वतीने  विद्यालयातील शिक्षकांचे ऋणनिर्देश म्हणून गुरु-शिष्य हे ऋणानुबंध अबाधित रहावे या स्नेह भावनेने शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला.

या बॅच ची विद्यार्थ्यिनी सविता मुगळे नी आपला पती गंभीर आजार दुरुस्त व्हावे म्हणून शरीरातील अवयव दान देऊन पतीला जीवनदान दिल्यामुळे वर्ग मिञ-मैञिणींच्या वतीने स्नेह भावनेने भावनिक होऊन सविता मुगळे चा सत्कार करण्यात आला.

दि. 16 आक्टोबर ला संस्थेचे सचिव आदरणीय प्रा. सुरेशदाजी बिराजदार साहेब यांनी विद्यालयात कर्मचाऱ्यांची बैठक घेतले होते, या बैठकीत सहज म्हणाले होते ब-याच शाळेत गेट टुगेदर चे कार्यक्रम होतात, दिपावलीनंतर आपल्या पण शाळेत 25-26 तारखेला गेट टुगेदर कार्यक्रमाचं नियोजन करण्यासंदर्भात बोलले होते..
    श्री. विश्वजीत बिराजदार व  संतोष बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष राठोड, सोमनाथ तेलंग, सोनाली साळुंके, महाळाप्पा दुधभाते, ज्ञानेश्वर मुगळे व गोपाळ जाधव यांनी पुढाकार घेऊन 1999 च्या बॅच चा गेट टुगेदर कार्यक्रम घेऊन संस्थेचे सचिव बिराजदार साहेबांची संकल्पना पुर्ण करुन विद्यालयात 1 नंबर कार्यक्रम घेण्यात आला.

     शेतकरी शिक्षण प्रसारक या संस्थेची स्थापना इ स 1969 या  वर्षी झाली, संस्थेच्या स्थापनेस 56 वर्षे पूर्ण झाले, खरोखरच आजचा योगायोग म्हणजे गेट टुगेदर कार्यक्रमाला 1999 च्या  बॅच चे 56 वर्गमित्र उपस्थित होते.... म्हणून या आनंदोत्सवात उपस्थित वर्ग मिञ-मैञिनींना फेटे बांधुन गौरव करण्यात आला.

      या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. संतोष बिराजदार यांनी केले.
 
गेट टुगेदर कार्यक्रमात प्राचार्य पी टी कांबळे, श्री. बळीराम नांगरे व श्री. एस टी गायकवाड यांनी मनोगतपर विचार व्यक्त करुन  आमचा भव्य सत्कार केल्याबद्दल व कार्यक्रमाचे नियोजन अप्रतिम केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने 1999 च्या बॅच च्या सर्वांचेच अभार मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष राठोड यांनी केले तर अंजली गुंजोटे यांनी मनोगत व्यक्त करुन अभार मानले.
                 दुसर्‍या सञात

    माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेल्या आप-आपल्या वर्ग खोल्याची कौतुकाने पहानी करुन आपले वर्ग मिञ- मैञिनीच्या गाठी-भेटी घेऊन शाळेतील जुन्या आठवणीना उजाळा देऊन आप-आपल्या वर्गात ग्रूप फोटो काढून, नंतर 1999 ला शिकत असताना वर्गातील ठरवून दिलेल्या बाकड्यावर आपल्या वर्गात सर्वजन स्थानापन्न झाले.
     श्री. बळीराम नांगरे सरांनी  हजेरी घेतले व श्री के टी गायकवाड सर यांनी हिन्दी विषयाचा पाठ घेतले.
त्यानंतर 1999 च्या बॅच च्या वतीने सर्वांसाठीच स्वादिष्ट व रुचकर स्नेह भोजनाचे नियोजन करण्यात आले होते.
स्नेह भोजनानंतर 1999 च्या बॅच च्या वर्ग मिञ-मैञिनीने स्वतंत्र कार्यक्रम घेऊन सर्वजन 26 वर्षानी एकञित आल्यामुळे प्रत्येकानी आप- आपला परिचय करुन दिले व सध्या कार्यरत असलेली माहिती दिले.
    या कार्यक्रमात ब-याच जनांनी खेळी-मेळीच्या वातावरणात मनसोक्त मनोगत व्यक्त केले.
गेट टुगेदर कार्यक्रमाचा समारोप
 वंदे मातरम् गीत घेऊन करण्यात आला

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भोसले ,बालाजी मुर्टे, सतीश कुंभार, राम दुधभाते, गणेश वाडीकर, शंकर बिराजदार, अजिंक्य काळे यांचे अमुल्य योगदान लाभले.
Previous Post Next Post