भाऊबीज
बंध रेशमाचे नाते
अतूट बहिण भावाचे !
माझ्या आनंदाहून प्रिय
आयुष्य माझ्या भावाचे ...
येणार भाऊ भाऊबीजला
आस वेडी तुझ्या भेटीची
वाट पाहते मी वेशीला
बनवते पोळी पुरणाची
सडा रांगोळी पाट टाकते
दारी फुलांचे तोरण सजवते
भावासाठी उपवास ठेवते
गोड गोड स्वयंपाक बनवते
उदंड आयुष्य भावाचे
सदैव मागणी देवाला
अतूट नाते आहे स्नेहाचे
मनी हर्षीओवाळते भावाला
उभा राहतो पाठीशी
करतो रक्षण बहिणीचे
बहिणीसाठी लढतो जगाशी
सदैव हित चिंततो बहिणीचे
मनी विचारांचे स्पंदन
झिजतो अखंड बहिणीसाठी
पित्या परी होऊन चंदन
गंध फुलवतो बहिणीसाठी
सौ,भाग्यश्री संदीप बारवाल
छत्रपती संभाजी नगर.