भाऊबीज
कौटुंबिक बहीण भाऊ
असल्याचा करू नये दावा,
परक्याही बिहिणीसाठी
करावा संकटात धावा
समजावे भावाने हीसुद्धा
माझीच बहीण आहे,
सख्या बहिणीचे रक्त लाल
तिच्या धमण्यातूनही वाहे
करावा विचार दुसऱ्यासाठी
अगदी आपल्या बहिणीसम,
देता मान सन्मान तिलाही
उरणार नाही कोणताच तम
बहीण भावाचे नाते कसे
पवित्र मानले जातात,
गुणगान भावाचे बहिणी
सदोदित प्रेमपूर्वक गातात
ओवाळणी तेव्हाच ठरेल
अनमोल लाडक्या बहिणीची,
जेव्हा भाऊ लाडका धावेल
सुटका करण्या हरिणीची
किती वाढला अत्याचार
दिवसेंदिवस लाडकीवर,
रक्षण करण्या सदैव
पुढे आणावे दणकट कर
भाऊबीज एकदा तरी
करावी अशी साजरी,
समाजातील बंधुभाव
टिकून राहील घरोघरी.
कवयित्री किरणताई मोरे चव्हाण
रा सालेकसा जी गोंदिया
मो न 9011770810
