"पाडव्याचा गोडवा "
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला
बळीराजाला मानूया पुज्य
दानशूर, क्षमाशील वृत्तीच्या
बळीराजाचे येऊद्या राज्य ||१||
सत्वशील, दानशूर गुणांनी मिळाले
पाताळाचे राज्य बळीराजाला
वामनावतारी विष्णूच्या सत्वपरीक्षेत
बळीराजा सचोटीने खरा उतरला ||२||
कार्तिक शुद्ध प्रतिपदा मुहूर्त अर्धा
साजरा करुया दिवाळी पाडवा
सोने खरेदी, शुभ कार्य करुया चला
आनंद ऊत्साह येतसे भरभरून नवा ||३||
सण हा आला वर्षाचा उल्हास घेऊन
पतीपत्नीचा आनंद ओसंडे भरभरून
पतीस करावे औक्षण पत्नीने प्रेमाने
मान आदर राखावा पतीने भेटवस्तू देऊन ||४||
साडेतीन मुहूर्तांपैकी एक स्थान मिळे
दिवाळी पाडव्याला शुभकार्य व्हावे
चित्ती असू द्यावे समाधान मोद
शुभाशीर्वाद मिळे त्यात समाधान मानावे ||५||
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे
८९७५८२८६१२