दीपावली
आली आली दीपावली
हर्ष फुले सर्वांच्या मनी !
सुगंधित उठण्याने
गंध फुलवे तनी मणी...
फराळाचा घमघमाट
लगबग आवराआवरीची !
भांड्याकुंडांचा सुळसुळाट
अलंकार सावरासावरीची...
प्रसन्न मनी प्रकाश झळके
दिव्यातील ज्योत शांत जळे !
प्रसन्न तनी तेज चमके
तिमिरास सर्वत्र दूर करे...
दिव्यांची झगमगाट
भावनांच्या रणांगणात !
काजव्यांची सरसराट
रात्रीच्या या चांदण्यात...
अंगणी शोभे रांगोळी
आकाश कंदील आकाशी !
माता लक्ष्मी प्रसन्न होई
मिळेल आशीर्वाद सर्वांशी...
सौ,भाग्यश्री संदीप बारवाल.
छत्रपती संभाजी नगर.