Home

सौ. स्नेहल अभ्यंकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 


सौ. स्नेहल अभ्यंकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


अलिबाग (प्रतिनिधी)


 ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्था,नाशिक आयोजित "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" कार्यक्रमात सौ.स्नेहल दीपक अभ्यंकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.निमित्ताने आदरणीय आप्पासाहेब कुलकर्णी यांनी केलेले स्वागत हे अविस्मरणीय असे होते. प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, आपुलकीने विचारपूस करणे हे हृदयाला हात घालत होते,असो. त्याचबरोबर ज्ञानसाधना बहुउद्देशीय संस्था, नाशिक चे अत्यंत अभ्यासू, हुशार आणि मनापासून, हृदयापासून तळमळ करणारे धुरंधर अध्यक्ष आदरणीय राजारामजी गायकवाड साहेब यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते

   महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या गुरुजनांचा तसेच नाशिक महानगरातील व नाशिक जिल्ह्यातील गुरुजनांचा ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्था,नासिक तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आम्हा सर्वांना सन्मानित करण्यात आले आणि निश्चितच ही पुरस्कार रुपी थाप आम्हाला तुम्ही देऊन आमच्यात जी ऊर्जा निर्माण केली, जे बळ आम्हाला दिले, ते निश्चितच पुढे आमच्यासाठी प्रेरणादायी असेल.उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि आदरणीय संस्थेचे अध्यक्ष राजारामजी गायकवाड,सचिव कुलकर्णी सर तसेच  यांचेही मनापासून आभार .तसेच आजच्या कार्यक्रमाचा शेवट आभार च्या स्वरूपामध्ये आदरणीय प्रदीप जगताप सर यांनी अतिशय सुंदर व अविस्मरणीय केला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.. आभार.. आभार..!!सर्व पुरस्कारार्थी गुरुजनांचे मनापासून अभिनंदन ! अभिनंदन ! आणि पुढील अशाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी, शैक्षणिक  वाटचालीसाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

Previous Post Next Post