राजाभाई केणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आयोजित अलिबागमध्ये रोजगार मेळावा
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर)
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्यातर्फे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन पोयनाड येथे रविवारी (ता.१२) करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील ४० पेक्षा अधिक विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला १०० टक्के नोकरीची संधी उपल्ब्ध होणार आहे. याठिकाणी मुलाखत झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रही देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या रोजगार मेळाव्यात नर्सिंग, मॅन्युफॅक्चिरंग, फायनान्स, रिटेल, सेल्स मार्केटींग, बँकींग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलीटी, सिक्युरीटी, टेलिकॉम व इतर, आय.टी.आय, बीपीओ / केपीओ, फार्मा इत्यादी क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात १८ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. मेळावा पाटील ब्रदर हॉटेल रिसॉर्ट, पांडवादेवी, पोयनाड येथे रविवारी (ता.१२) सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी 9158681444 / 7028035444 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यामुळे अलिबाग तालुक्यातील हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे. नोकरी-व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी 'रोजगार मेळाव्या'ची गरज कायम आहे. रायगड जिल्ह्याची राजधानी आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या अलिबाग येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राजाभाई केणी यांच्या बतीने वेळोवेळी प्रयत्न केले जातात. त्यांनी यापुर्वी आयोजीत केलेल्या रोजगार मेळाव्यातून अनेकांना नोकऱ्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मागील काही काळात अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवन तसेच अन्य ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतरचा हा सर्वात मोठा रोजगार मेळावा असून यामध्ये अनेक नामांकीत कंपन्या सहभाग नोंदवणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी दिली. या मेळाव्यांमध्ये विविध खासगी आस्थापनांनी सहभाग घेऊन एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., डिप्लोमा, पदवी तसेच इंजिनिअर झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून गणला जात असला तरी, अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे शहराकडे धाव घ्यावी लागते. यामुळे येथे रोजगाराच्या शोधात स्थलांतरणाचेही प्रमाण खूपच वाढले आहे. स्थानिकांना जिल्ह्यात नोकऱ्या मिळत नसल्याने हे तरुण मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीच्या शोधात जातात. या स्थळांतरणामुळे रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा तालुक्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. हे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हे शिवसेनेचे प्रमुख ध्येय असल्याचे राजाभाई केणी यांनी सांगितले असून जिल्हा भरातील जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून नोकरीची संधी मिळवावी, असे आहावन राजाभाई केणी यांनी केले आहे.