Home

दिवाळी...कवयित्री आम्रपाली (आमु) घाडगे



दिवाळी


 संस्कृतीचा जपून ठेवा 

चैतन्याची बरसात झाली 

सुखाला समृद्धीची किनार 

आनंद घेऊन दिवाळी आली 


उत्सवाचा शिंपीत सडा 

दारी मांगल्याचे तोरण माळी

अंगणी शकुणाची रांगोळी 

आनंद घेऊन दिवाळी आली 


हिरमुसल्यांचा मोद होऊनी

हळूच खुलवत हसू गाली

सौख्याची करत उधळण

आनंद घेऊन दिवाळी आली 

 

राग मत्सर मोह त्यागूनी

लेप शांतीचा लावून भाळी

समानतेचा होऊन कंदील

आंनद घेऊन दिवाळी आली 


तामसी वृत्ती नाश करुनी

दारोदारी पणती झाली 

देण्या भरभराटीचे दान 

आंनद घेऊन दिवाळी आली


आम्रपाली (आमु) घाडगे 

Previous Post Next Post