दिवाळी पाडवा
विक्रम संवत्सर प्रारंभ दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा
गोवर्धन पूजनाचा दिन म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
बळीराजाचा स्मरणदिन म्हणजे पाडवा
इडा पिडा सरण्याचा दिन बळी पाडवा
बळीच्या दातृत्वाचा दिवस असे पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
शरदाच्या सोबतीने येई दिवाळीपाडवा
आसमंताची शीतलता म्हणजे पाडवा
चैतन्यमयी वातावरण म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
घरापुढील आकाशकंदील असे पाडवा
दारास बांधलेले तोरण म्हणजे पाडवा
दारापुढील रंगावली म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असे पाडवा
शुभकार्याचा श्रीगणेशा म्हणजे पाडवा
विजयाची मुहूर्तमेढ म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
सुख समृद्धीचे प्रतिक म्हणजे पाडवा
मनोमिलनाचा उत्सव म्हणजे पाडवा
सुखानंदाची पखरण म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
दीपोत्सवाचा केंद्रबिंदू असे पाडवा
चित्त प्रफुल्लित करणारा सण पाडवा
व्यापारी संवर्गाचा नववर्षारंभ पाडवा
सुमंगलाचा संकेत असे दिवाळीपाडवा
©️ श्री.प्रविण शांताराम म्हात्रे
(पनवेल