मानवता प्रतिष्ठान' आयोजित 'गरिबांची दिवाळी' हा कार्यक्रम सारणवाडी, वाशाला येथे थाटामाटात संपन्न
ठाणे(प्रतिनिधी).
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 'मानवता प्रतिष्ठान' आयोजित 'गरिबांची दिवाळी' हा कार्यक्रम सारणवाडी या कसारा भागात असलेल्या वाडीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षी 'मानवता प्रतिष्ठान'कडून, 'मानवता हाच धर्म' हा उद्देश समोर ठेऊन वृक्षारोपण, 'रक्तदान शिबीर' यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक असलेला महत्त्वाचा असा कार्यक्रम म्हणजे 'गरिबांची दिवाळी' या कार्यक्रमामध्ये आदिवासी भगिनींना भाऊबीज म्हणून त्यांना साडी-पातळ भेट म्हणून दिली जाते तसेच आदिवासी बंधूंना फराळ व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणात टिकून ठेवण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात, ह्यावेळी देखील 50 आदिवासी महिला भगिनींना भाऊबीज करून साडी-पातळ भेट स्वरूप देण्यात आल्या तसेचं 25 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू भेट देण्यात आल्या. ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा सामाजिक बांधिलकी जपणे असून अशा कार्यक्रमांमुले एक वेगळेच मानसिक समाधान मिळत असल्याची भावना मानवता प्रतिष्ठांच्या सदस्यांनी बोलून दाखवली हा कार्य