Home

भाऊबीज... अभंगकार रविंद्र सोनावले


 भाऊबीज.


भाऊबीज आहे l पवित्र नात्याचा l 

मंगल नाट्याचा l जीवनात ll१ll 


ताई येते घरी l भाऊबीजे साठी

आहे माझ्या पाठी l आईसम ll२ll


मोठी आहे ताई l छोटा तिचा भाऊ l

देते मला खाऊ l आवडीचा ll३ll


ओवाळते मला l पंचारती घेत l

मुखी पेढा देत l प्रेमभरे ll४ll


ताईची काळजी l करतो रक्षण l

देतो संरक्षण l ताईसाठी ll५ll


भाऊबीज दिनी l देतो तिला भेट l

तिच्या हाती थेट l भेटवस्तू ll६ll


भाऊबीज आहे l ओवाळणी क्षण l

शेवटचा सण l भावासाठी ll७ll


रविंद्र सोनावले...

     मुंबई

Previous Post Next Post