Home

नाते प्रेमाचे.... कवयित्री वाणी केरकलमट्टी


 

नाते प्रेमाचे 


नाते बहीण भावाचे 

अतूटश्या बंधनाचे  

एकमेकां संवर्धन 

स्मरण त्या बालपणाचे....

आस नाही कोणत्या 

गोष्टीची,

फक्त साथ हवी असते 

शेवटपर्यंत नाते 

टिकवून ठेवण्याची.....

आई, बाबांची कमतरता 

भासून न देता त्यांचे स्थान जपण्याची,

कितीतरी भाव येतात आज मनाच्या एका हळव्या हृदयाच्या कोपऱ्याशी.....

एक असे बंध भाऊ आणि बहिणीचे, जे अव्यक्त असून शेवटच्या क्षणापर्यंत भावनिक नाती जपणारी.....

चंदनाचे उटणं,

तुपाचा दिवा,

तूच तर आहेस 

आई बाबांनंतर आमच्या 

आयुष्याचा ठेवा....

नशीबवान आहोत आम्ही 

दोघी बहिणी 

तुझ्या सारखा भाऊ असता पाठीराखा 

नको दुसरे कोणी.......


वाणी वेणूमाधव केरकलमट्टी

.अमेरिका

Previous Post Next Post