ऋणानुबंध
प्रेम एक ऋणानुबंध
ताकत ही जीवनाची
मिळाली सोबत तुझी रे
आयुष्यात लाखमोलाची....1
तुझ्या सहवासाच्या वेलीवर
ऊमलले फुल कळलेच नाही
तू माझा माझा म्हणताना
मी तुझी झाले कळलेच नाही....2
प्रथम भेटीत तुला
हृदय माझे वाहिले
तुझे डोळे मनमोहून घेतात
कसे ऋणानुबंध जुळले.....3
तुझा स्पर्श पुन्हा व्हावा
नजरेत तुझ्या नजर मिळावी
पुन्हा एकदा परत
ती पहिली भेट व्हावी.....4
सौ. वैजयंती विकास गहूकर
जिल्हा चंद्रपूर
