दसरा
विजयादशमीचा सण
सण साजरा हा होतसे
आनंदित हे घरदार
घरदार सुखी हे असे
तयार तत्पर सगळे
सगळे दूर सीमापार
मनाचा गळुनिया गर्व
गर्व होईल तडीपार
दसरा हा साजरा करु
करू निर्धार वेगळा
भ्रष्टाचार ग्रस्त असे हे
हे बाळगी अंतरी कळा
जेव्हा न्याय त्यांना मिळेल
मिळेल सुख सरे दुःख
दुःखाचा निचरा होईल
होईल स्वप्नपूर्ती सुख
नवरात्राची उपासना
उपासना करुनी मनी
वागणे असू दे रे शुध्द
शुध्द भाव येती जन्मूनी
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे
८९७५८२८६१२