दसरा
विजयादशमी म्हणजे
विजयाचे प्रतीक,
अश्विन शुद्ध दशमीला
साजरा करतात भाविक...... 1
उत्सव हा विजयाचा
आनंद वाटण्याचा,
वाईट गोष्टीचा त्याग करून
नव्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा..... 2
मांगल्याचे प्रतीक
आहे हा सण
हेवेदावे विसरून
जोडावे प्रत्येकाचे मन...... 3
रामाने सीता आणली घरी
रावणाचा वध करून
अधर्मावर धर्माचा
विजय मिळवून...... 4
आपट्याचे पाने वाटून
आशीर्वाद घ्यावा
सुख समृद्धीचे प्रतीक म्हणून
थोऱ्या मोठ्यांना मान द्यावा...... 5
सौ. वैजयंती विकास गहूकर
(चंद्रपूर)