हँलोविन.
31आक्टोबर दिवशी युरोपियन देशात,अमेरिकेत साजरा केला जाणारा सण म्हणजे हँलोविन, एकोणिसाव्या शतकात आय्रलंड व स्काँटलंडमधे या सणांना प्रथम ओळख मिळाली असून किंवा हँलोविन या सणाचा उगम झाला हा ख्रिस्ती लोकांचा सण आहे असे मानले जाते,बहुतांशी स्पँनिश लोक हा सण साजरा करतात.अलीकडे इंग्लंड, अमेरिका आणि काही युरोपियन देशात हा सण साजरा केला जातो,किंबहुना भारतात ही हळूहळू हा सण काही ठिकाणी साजरा करायला सुरूवात झाली आहे
31 आक्टोबरच्या आधीपासूनच या सणासाठी घरोघरी जय्यत तयारी केली जाते.
सर्व चांगले मृतात्मे,पुण्यवान संत आत्मे,योध्ये शूर विर म्हणून जे मृत्यू पावले आहेत त्यांची आठवण म्हणून हा सण साजरा करतात, थोडक्यात आपल्या भारतात पक्षपंधरवडा मृत आत्माच्या आठवणी व पुजेसाठी आपण मानतो आणि सर्वपित्री आमावस्या शेवटचा दिवस ज्यादिवशी सर्व पितरं जेवायला येतात अस आपण मानतो तसाच हा काहीसा प्रकार म्हणजे हँलोविन सण होय.या सणादिवशी सर्व मृतात्मे कुटुंबियांना भेटायला येतात असा समज आहे,याला सँमहँन असही म्हणतात.
31 आक्टोबर नंतर कडक थंडीला सुरुवात होते...तसेच हे दिवस शेतातील धान्य कापणीचे असतात त्यामुळे यादिवसात पूर्वजांचे आत्मे शेतातील कामात मदत करण्यासाठी पृथ्वीवर येतात,पिकांची नासाडी होऊ नये म्हणून राखण करतात असाही एक समज युरोपीय बांधवांमधे असतो.
यासाठी भुतांचे मुखवटे,सांगाडे,विचित्र प्राण्यांच्या प्रतिकृती, घूबड,चेटकीणी,भूतांचा पोशाख घालून काही आकृत्या घराबाहेर आरास केल्याप्रमाणे सजवून ठेवतात,काही ठिकाणी तर समुद्री चाचे,चेटकिणी एकमेकांशी बोलणारे देखावे उभे करतात, तर काही ठिकाणी स्मशानभूमीचा देखावा क्रुस, पुष्पचक्र घातलेले काँफिन,लँटिन भाषेतील शिलालेख, प्लँस्टिकच्या छोट्या भोपळ्यांची लाईटच्या माळांची सजावट,पांढरी गँस भरून केलेली भूत,असे कितीतरी प्रकारे दाराबाहेर कलापूर्ण सजावट पहायला मिळते.
भोपळ्याला डोळे नाक,तोंड कोरुन त्यात लाईट वा मेणबत्ती लावतात आणि घरासमोर असे अनेक वेगवेगळ्या आकाराचे कोरलेले भोपळे सजवितात याला जँक-ओ-लँन्टर्न म्हणतात.
हँलोविनच्या दिवशी म्हणजे 31आक्टोबरला
ख्रिश्चन बांधव चित्रविचित्र पोशाख करतात यात विचित्र प्राणी,भूतं,,वेगवेगळे मुखवटे,घाबरविणारा मेक अप केला जातो. रात्रभर अशा पोशाखात रस्त्यावर फिरताना लोक दिसतात.
लहान मुलांनाही भूतांचा किंवा विचित्र पोशाख घालतात ही मुल आजुबाजुच्या घरात जाऊन लोकांना घाबरवतात पण यादिवशी मुलांना माफ केले जाते,हँलोविन नाईट मधे ही मुल शेजारच्या घरात जाऊन ट्रिक -आँर- ट्रीट अस म्हणतात म्हणजे तुम्ही त्यांना चाँकलेट,मिठाई द्या किंवा त्यांच्या सारखा विचित्र पोशाख ,चेहरा रंगवून त्यांना घाबरून सोडा असा आहे. त्यारात्री हँलोविन पार्टी सुध्दा केली जाते. पार्टी मधे चेष्टा,खोड्या काढणे,एँपल बाँम्बिंग,भितीदायक कथा सांगणे,हाँरर फिल्म पहाणे,घरगुती गप्पा टप्पा यात पूर्वजांबद्दल कथा सांगणे इत्यादी प्रकारे हँलोविन नाईट साजरी करतात. थोडक्यात पूर्वजांच्या आठवणी आणि वाईट आत्म्याना अटकाव करण्यासाठी भोपळा शुभ मानला जातो आणि कल्पकतेचा, कलाकृतीचा एक उत्कृष्ट अविष्कार म्हणजे हँलोविन सणात वापरात येणारे भोपळ्याचे विविध, चित्रविचित्र चेहरे,प्रेक्षणीय सजावट,भयावह आभास,आणि जल्लोष, आनंद, हरवलेल बालपण जपण्यासाठी मोठ्या लोकांनी केलेली धडपड सगळ,सगळ,सामावलय या हँलोविन मधे. हँलोविनच्या दिवशी भोपळ्याच्या बियांचे पदार्थ ,भोपळा पाय,भोपळा केक बनवतात, हे ऐकल्यावर मला खरच हसू आल कारण आपल्याकडेही श्राध्दाला भोपळ्याच भरीत लागत. मला वाट जगाच्या पाठीवर कुठही जा ,भले सण त्यांची नावं वेगळी असतील,साजरा करण्याच्या पध्दती वेगळ्या असतीलही पण त्यांच्या मुळाशी असणारी मूळ संकल्पना साधर्म पहाता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे" हे विश्वची माझे घर"हेच किती खर होत ते हे सगळ पहाताना वाटतय ना? हो खरच वाटतय.
सौ.मानसी मोहन जोशी
ठाणे (प)
