रत्नागिरी एमआयडीसीत वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड; नेपाळी महिलेला घेतले ताब्यात
रत्नागिरी(प्रतिनिधी)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत रत्नागिरी एमआयडीसी परिसरात धाड टाकत एक नेपाळी नागरिक महिलेवर कारवाई केली असून दोन महिलांची देहविक्रीतून सुटका करण्यात आली आहे.
१८ सप्टेंबर रोजी LCB पथकाला एमआयडीसी रत्नागिरी येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे डमी ग्राहक पाठवून प्लॉट क्र. ई-६९, मिरजोळे, एमआयडीसी येथे छापा टाकण्यात आला. या वेळी एक नेपाळी महिला पुण्यातील दोन महिलांमार्फत देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनि. शबनम मुजावर, श्रेणी पोउनि. संदीप ओगले, पोहेकॉ. विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, मपोहेकॉ. स्वाती राणे, शितल कांबळे, मपोकॉ पाटील व पोना. दत्ता कांबळे यांनी सहभाग घेतला.
