सागर किनारा
सागर किनारा,आम्हां वरदान
निसर्ग हा दाता, ठेवू याचे भान ||ध्रु.||
सागराच्या लाटा,उसळल्या खूप
निसर्गाचे दिसे,आगळेच रूप
खळखळ ध्वनी,तृप्त करी कान
निसर्ग हा दाता,ठेवू याचे भान..||१||
भावोत्कट असा,दिसला सागर
अनुभवाचीही,भरली घागर
उगवता रवि,वाढवितो शान
निसर्ग हा दाता ठेवू याचे भान..||२||
डोळ्याचे पारणे, खरंच फिटले
आकाशात मेघ,सर्वत्र दाटले
सागर किनारा,आम्हां अभिमान
निसर्ग हा दाता,ठेवू याचे भान..||३||
जैव विविधता,सौंदर्य टिपावे
पर्यटन स्थळी, निसर्गा जपावे
वसुंधरा देई,अमूल्य हे दान
निसर्ग हा दाता ठेवू याचे भान..||४||
अरविंद कुळकर्णी
मलकापूर
मो.९८२२६४२२९४
